काही बोललीस का?

Kahi Bolalis Ka – Shubhra Kalya Moothbhar

“शुभ्र कळ्या मूठभर” या अल्बम मधलं “काही बोललीस का?” हे गाणं माझ्या भावाने, विशालने अतिशय सुंदर चित्रित केलं आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी अभिनय केलेल्या या व्हिडियोची व्हिडियोग्राफी शिरीष देसाई यांची आहे आणि संकलक आहेत प्रेषित जोशी. गीत शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं आहे आणि आवाज आहेत रंजना जोगळेकर आणि ऋषिकेश कामेरकर यांचे. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

Published in: on मे 20, 2009 at 10:35 सकाळी प्रतिक्रिया (5)

The URI to TrackBack this entry is: http://ksinamdar.wordpress.com/2009/05/20/30/trackback/

RSS feed for comments on this post.

5 प्रतिक्रिया Leave a comment.

  1. अतिशय सुंदर गाणे…आणि तितकेच छान चित्रण !! अप्रतिम…!!!

  2. सुंदर गाणं. उत्तम छायाचित्रण आणि संकलन. खास करुन मोनोटोन आणि रंगित चित्रणाचा केलेला वापर. चाळिच्या एन्ट्री जवळ ठेवलेली झाकलेली स्कुटर गाण्यात दोनदा दिसते ( येकदा ते डेट वरुन येताना मोनोटोन मधे आणि येकदा शेवटी )मात्रं मधली येव्हढी वर्ष गेलि तरि ती त्याच जागी अगदी तशीच दिसते हे खटकतं. तसच गाण्याच्या सुरुवाती पासुन लिपसिंक न कर्ता पुढच्या कडव्यापस्सुन केलं असत तर आधि मुकं पणे केलेले इशारे आनी उतार्वयात ला मुकपणा चांगला अधोरेखित झाला असता असं वाट्तं
    धन्य्वाद

  3. कौशल
    मागच्या आठवड्यात प्रोग्राम पाहिला टिव्हीवर.. छान झाला कार्यक्रम. पण प्रत्येक वेळी लिल चॅम्प्स बरोबर कम्परिझन होतेच. ते कधीही चांगले गातात. भेलांडे चा.. जाउ दे.. शुभेच्छा..

  4. By the way Song is GooooooD! keep it up!!

  5. गाणे खुपच छान आहे…..वातावरणामुळे आमच्या नासिकच्या जुन्या वाड्यात गेल्यासारखे वाटले…..
    तुम्हाला T.V. वर अनेकदा पाहीले आहे पण प्रत्यक्षात अशी प्रतिक्रीया देऊ शकेन असे वाटले नव्हते….
    लिखाण मनापासुन आवडले…तुमच्या गाण्यांसारखेच सुरेल आहे ते!!
    तन्वी


Leave a Comment